पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याकडून बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित तरुणीवर दबाव टाकला जात आहे. गुन्हा मागे न घेतल्यास शरीरसंबंधाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकी दिली जात आहे. तसंच बंदुकीचा धाक दाखवून समजुतीच्या करारावर सह्या घेतल्या असल्याचं पीडितेनं म्हटलं आहे.
त्याचबरोबर सतीश दादर, अमोल गोयल,प्रवीण साळवी यांनी कुचिक यांना मदत केली असून त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी तरुणीनं केली आहे. याबाबत इमेल देखील मुख्यमंत्रीना पाठवला असल्याची माहिती तरुणीनं दिलीय.
कंकुचिक यांनी रोहित भिसे या मित्रासोबतही ते व्हिडीओ शेअर केले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून कुचिक यांचे मित्र ऍड अतुल शिंदे यांनी माझ्याकडून करारनामा करून घेतला. असंही पीडितेन म्हटलं आहे. मला यापुढं काही झाल्यास सर्वस्वी रघुनाथ कुचिक हेच जबाबदार असतील असं पीडित तरुणीनं म्हटलं आहे.