पुणे : ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात ध्वजवंदन झाले. या वेळी देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी व महिला स्वातंत्र्यसैनिक यांचा सन्मान करण्यात आला.
(कै.) श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात आले. मंदिर स्थापनेचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
या वेळी माजी आमदार उल्हास पवार, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागीरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड. रजनी उकरंडे, सुनील रुकारी, युवराज गाडवे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई उपस्थित होते. या वेळी ९७ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक श्यामल गुप्ते, शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या वीरमाता गीता गोडबोले, शहीद जवान विजय मोरे यांच्या वीरपत्नी दीपाली मोरे यांचा सन्मान करण्यात आला.