पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा; चंद्रकांत पाटलांचा कॉंग्रेसवर हल्ला

पुणे | कॉंग्रेससह विरोधकांना पराभव स्पष्टपणे समोर दिसत आहे. त्यामुळे ते संविधान बदलाची भाषा करत आहेत. वास्तविक, कॉंग्रेसने स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी संविधानाच्या मूळ गाभ्यालाच धक्का लावल्याचा प्रहार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपाचे अतुल साळवे आणि रिपाइं आठवले गटाचे नेते सुखदेव अडागळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान रथाचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ , बापू ढाकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. राहुल म्हस्के, भारत भोसले, मायाताई पोसते, उज्ज्वलाताई सर्वगोड, जितेश दामोदरे, अतुल सावे, डॉ संदीप बुटाला, शाम देशपांडे , छायाताई मारणे, शिवसेनेचे मयुर पानसरे, मनसेचे गणेश शिंदे गणेश शिंदे, राज तांबोळी, आशुतोष वैशंपायन, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित.‌

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० ला आपल्याला संविधान मिळालं. त्यातून देश आणि राज्य कसं चालवलं पाहिजे; याची नियमावली तयार करण्यात आली. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेतली. २६ नोव्हेंबर १९४९ ला त्यांनी संविधानाचा मसूदा लोकसभेत सादर केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी तो स्विकारला गेला. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी हा मसुदा लोकसभेत सादर केला; तो दिवस मोदींनी संविधान दिवस म्हणून जाहीर केला. या दिवशी देशभरात प्रत्येक ठिकाणी संविधानाचं पूजन केलं जातं. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जातं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा असा सन्मान कॉंग्रेसने कधीही नाही.

ते पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच महिलांना आणि गरीबांना मताचा समान अधिकार मिळाला. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदभाव केला नाही. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा संपूर्ण जगाने यांचा आदर्श घेऊन आपलं संविधान तयार केलं आहे.

कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पासून १०६ वेळा घटनेत दुरुस्ती झाली. कॉंग्रेसने घटनेच्या मूळ गाभ्यालाच बोट लावले.‌ इंदिरा गांधी यांनी स्वत:चं पद टिकवण्यासाठी घटना दुरुस्ती केली. तसेच, ९० वेळा संविधानातील कलमांचा गैरवापर करुन राज्य सरकारे बरखास्त केली. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी गरिबांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण मिळवून दिलं. तसेच, महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. अटलजींनी सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळवून दिला. माननीय मोदीजींनी देशाची सुरक्षा लक्षात घेऊन ३७० कलम हटवताना एकदाच बरखास्त केला. असा जोरदार प्रहार केला.‌

ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यातील सभेत आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, असं मत व्यक्त केलं. पण इतके वर्ष कॉंग्रेसचं राज्य देशात आणि राज्यात होतं. तेव्हा त्यांना याची आठवण का नाही झाली. १९९२ ला मराठा समाजाला आरक्षण देताना शरद पवार मुख्यमंत्री होते. पण त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले नाही. त्यामुळे विरोधकांना पराभव दिसू लागल्याने आरक्षण बदलणारची अफवा पसरवत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील पाच ठिकाणं तीर्थक्षेत्र घोषित केली. कॉंग्रेसने का नाही केली. त्यामुळे दलित समाजाला याची जाणीव आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.‌ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मंदार जोशी यांनी केले. तर आभार जितेश दामोदरे‌ यांनी मानले.

Bhakti Chalak: