सर्वांची मने जिंकणारा लातूरचा ‘वृक्षरूपी गणपती’

लातूर – Ganeshotsav 2022 : सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या देखाव्यांची चर्चा सुरु आहे . त्यात मुंबई – पुण्याचे गणपती आणि त्यांचे देखावे पाहण्यासाठी राज्याच्या अनेक भागांतून गणेशभक्त याठिकाणी पोहोचतात. अशातच लातूर मधील एका अनोख्या गणपतीची राज्यभरात चर्चा सुरु आहे. येथील वसुंधरा प्रतिष्ठानकडून अक्षरशः झाडाचा गणपती साकारण्यात आला आहे.

लातूर मधील राजीव गांधी चौक परिसरात बसवण्यात आलेला हा गणपती मागील ५ वर्षांपासून असाच झाडाचा बसवला जातो. त्यातून पर्यावरणाबद्दल जनजागृती केली जाते. आणि देव देवळात किंवा दगडात नसून झाडांत असल्याचा संदेश दिला जातो. झाडाला सुपाचे कान, फेटा, कापसाचे हात आणि धोतर परिधान करून हा गणपती साकारला जातो आणि झाडाला गणपती मानून त्याची पूजा केली जाते.

लातूर मधील वसुंधरा प्रतिष्ठानने सर्व गणेश मंडळांना ‘एक गणेश मंडळ 21 वृक्ष’ या उपक्रमांतर्गत ८ ते १० फुट उंचीच्या झाडांचे रोपटे वाटप केली आहेत. एकूण ११०० झाडांची वाटप करत वसुंधरा प्रतीस्थांकडून वृक्षोत्सव – गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.

Dnyaneshwar: