पेठांमधील बांधकामांसाठी कायदा शिथील करावा, हेमंत रासने यांची मागणी

पुणे | Pune News – गावठाण भागातील वाडे आणि जुन्या सोसायट्यांचा विकास होण्यासाठी बांधकाम नियमावली शिथील करायला हवी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले आहे.

गावठाण भागातील अनेक वाडे आणि जुन्या सोसायट्यांचा विकास होणे अत्यंत गरजेचे असून युडीसीपीआर नियमावलीमुळे अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या नियमावलीनुसार बांधकाम 15 मीटर उंचीच्या वर गेल्यास एक मीटर साइड मार्जिन सोडण्याची अट घालण्यात आल्याने पुनर्विकास करण्यात अडचणी येत आहेत. तरी, या नियमात शिथिलता आणावी, असे रसाने यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुरातत्व विभागाच्या नियमावलीनुसार ऐतिहासिक वास्तूंच्या 100 मीटर परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी मिळत नाही. शनिवार वाडा परिसरातील अनेक मिळकतींना देखील याचा फटका बसत आहे. या नियमात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे रासने यांनी सांगितले.

Sumitra nalawade: