मुंबई – Legislative Council elections | विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून शिवसेनेचे दोन, भाजपचे चार आणि राष्ट्रवादीचे दोन्ही आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्या पंसतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजप- प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, शिवसेना- सचिन अहिर आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे.
दरम्यान, आता प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये 10 व्या जागेसाठी लढत आहे. मात्र याबाबत अद्याप निकाल लागला नाही.