सूर्यफुलाच्या फॅमिलीमधील असून, जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळांचा बहर असतो. परंतु व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आणि उत्तराखंडातील हेमकुंडसाहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून, पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी पाकळ्यांमध्ये गुंडाळल्यासारख्या दिसतात. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन-चार फुलांच्या ग्रुपमध्येच आढळते.
जुलै चालू झाला की whatsapp च्या स्टेटस ला, फेसबुकवर भरपूर ठिकाणी so called Brahmakamal चे photos यायला लागतात… आणि त्यासाठीच थोडीशी तुमच्या ज्ञानात भर म्हणून हा लेखन प्रपंच!! भारतात डचमन्स पाईप कॅक्टस या निवडुंग वनस्पतीला बचदा ब्रह्मकमळ असे संबोधले जाते. मुळात या दोन्ही वनस्पती अतिशय वेगळ्या असून, यांची कुळे(family) पण वेगवेगळी आहेत. ब्रह्मकमळ ही एक दुर्मीळ वनस्पती असून, ती हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पाहावयास मिळते. ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव Saussurea obvallata असे आहे.
तर डचमंस पाईप कॅक्टस किंवा क्वीन ऑफ नाईट ही एक निवडुंग वर्गीय वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Epiphyllum oxypetalum असे आहे ख ब्रह्मकमळ सूर्यफुलाच्या फॅमिलीमधील असून, जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आणि उत्तराखंडातील हेमकुंडसाहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून, पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी पाकळ्यांमध्ये गुंडाळल्यासारख्या दिसतात. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन-चार फुलांच्या group मध्येच आढळते. हे हिमालयातले फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. सध्या दुर्मीळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.
खोटे ब्रह्मकमळ कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. (म्हणजे काटे असतात, पण modified असतात) पाने fleshy, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, त्याला पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची, पांढर्या रंगाची, सुगंधित फुले येतात. ही फुले वर्षातून एकदाच, जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात, व सकाळपर्यंत कोमेजतात. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना pollination ला आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून अगदी सहज करता येते. पावसाळ्यात लावा नक्की जगते . .. दोन्ही झाडांचा फुलण्याचा हंगाम सारखा असल्यामुळे बचदा हा गोंधळ होऊ शकतो!! या पुढे आपणही सतर्क होऊ या व इतरांनाही आपले ज्ञान देऊ या!! कॅक्टसला ब्रह्मकमळ म्हणायची चूक नको करूया !!