मेस्सीच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, फिफा वर्ल्डकपच्या शेवटच्या सामन्यानंतर…

Fifa World Cup 2022 – अर्जेंटिनानं सहाव्यांदा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनानं क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला आहे. दरम्यान, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिओनेल मेस्सीचा वर्ल्डकपमधील शेवटचा सामना असणार आहे. मेस्सीनं या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

अर्जेंटिना शेवटच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत पोहचली. यानंतर मेस्सीनं अर्जेंटिनाच्या वृत्त संस्थेशी बोलताना आपल्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा फायनल खेळून संपणार आहे. मी याबाबत खूप खूश आहे. पुढचा वर्ल्डकप खूप वर्षांनी होणार आहे. मला नाही वाटत की मी पुढचा वर्ल्डकप खेळू शकेन. माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा उत्तमरित्या संपणार आहे’, असं मेस्सी म्हणाला.

पुढे मेस्सी वैयक्तिक रेकॉर्डबद्दल बोलताना म्हणाला, ‘रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत. मात्र, सांघिक उद्दिष्ट साध्य करणं हे त्यापेक्षाही महत्वाचं आहे. आमच्या दृष्टीने ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. आम्ही फक्त एक पाऊल मागे आहोत. आम्ही सर्वस्व पणाला लावून लढलो आहे. यावेळी वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही सर्व काही पणाला लावू.’

दरम्यान, मेस्सीनं या विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत पाच गोल केले आहेत. तसंच तो अर्जेंटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. मेस्सीच्या नावावर आत्तापर्यंत वर्ल्डकपमध्ये 11 गोल केल्याचा रेकॉर्ड आहे.

Sumitra nalawade: