साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची गरज; शरद पवार

लातूर : सध्या देशामध्ये विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा फैलावतानाचे चित्र दिसून येत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी साहित्यकांना केले आहे. ते उदगीर येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हिटलरने ‘माईन काम्फ’ पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रपोगंडा हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

पुढे पवार म्हणाले की, सध्याच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आल्याचे ते म्हणाले. या विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद आदी वाद जन्माला आल्याचेही यावेळी पवार यांनी सांगितले. मात्र, सध्याच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत असून, अशा प्रकारची प्रपोगंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देत असून, अराजकता ओढवण्यास कारणीभूत ठरत आहे.

Prakash Harale: