२१ कोटी लोकसंख्या घरांमध्ये नजरकैद
नवी दिल्ली : कोरोनाकाळाच्या अडीच वर्षांनंतर संपूर्ण जग खुले झाले आहे. चीन वगळता कोणत्याही देशात लॉकडाऊन लागू नाही. चीनमध्ये पाच दिवसांत आणखी २० शहरांत लॉकडाऊन लागू करण्यात आला. चीनमधील लॉकडाऊन असलेल्या शहरांची एकूण संख्या ४६ वर गेली आहे. लॉकडाऊनमध्ये असलेल्या लोकसंख्याही २१ कोटींहून ३४ कोटी एवढी झाली. चीन झीरो कोविड धोरण कठोरपणे लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.
परंतु प्रत्यक्षात त्याचा काही परिणाम दिसत नाही. सुमारे २.५ कोटी लोकसंख्येच्या शांघाय शहरात आधीपासून लॉकडाऊन लागू आहे. आता २.१५ कोटी लोकसंख्येच्या राजधानी बीजिंगमध्येही लॉकडाऊनचे संकट आहे. शांघायमध्ये अजूनही दररोज सुमारे १२ हजार लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. बीजिंगमधील वाईट परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने संपूर्ण शहराच्या कोरोना तपासणीचे आदेश दिले आहेत. म्हणूनच बीजिंगमध्ये रोज तपासणीसाठी रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत. चीनच्या वुहान शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या संक्रमणाची नवी प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळं सरकारनं शहरातील सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. वुहानची लोकसंख्या जवळपास १.१ कोटी आहे.
वुहानमध्ये जवळपास वर्षभरापेक्षा जास्त कालावधीनंतर स्थानिक पातळीवर कोरोनाचा फैलाव झाला आहे. जगभरातील कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण हा वुहान शहरात २०१९ मध्ये आढळला होता. चीनमध्ये अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा कोरोना संसर्ग पसरत असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी १० दिवसांत ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सध्या चीनमधील जवळपास १५ प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव असल्याचं, सांगितलं जात आहे. त्यामुळं सरकारनं लॉकडाऊनबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पसरत असलेल्या संसर्गासाठी वेगानं संसर्ग पसरणारा डेल्टा व्हेरिएंट आणि पर्यटनाचा हंगाम जबाबदार असल्याचं चीनच्या सरकारी संस्थांनी म्हटलं आहे. चीनमध्ये मंगळवारीच कोरोना संक्रमणाची ९० नवी प्रकरणं समोर आली आहेत. त्याचवेळी वुहानमध्येही स्थानिक पातळीवर कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग पसरत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
यापैकी ६१ जणांना स्थानिक पातळीवर कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य मिशननं दिली आहे, तर त्याच्या एक दिवस आधी ५५ जणांना स्थानिक पातळीवर कोरोनाची लागण झाली होती. देशामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात चीनला बर्याच अंशी यश आलं आहे. मात्र मोठी वर्दळ असलेल्या नानजिंग एअरपोर्टच्या कर्मचार्यांनाच कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनासमोरील चिंता वाढल्या आहेत. सरकारी संस्थांनी नानजिंगमध्ये राहणार्या ९२ लाख नागरिकांच्या तीन वेळा टेस्टिंग केल्यानंतर लॉकडाऊन जाहीर केलं आहे. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांत हुनान प्रांतातील चांगजियाजी या लोकप्रिय पर्यटनस्थळाच्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाची नवी प्रकरणं समोर आली. त्यानंतर हा भाग चर्चेत आला होता.