नवी दिल्ली : (Low domestic cylinder prices) मागील काही वर्षांपासून गगनाला भिडलेली महागाई लक्षात घेत, मोदी सरकारने देशातील भगिनींना रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर २०० रुपयांची सूट दिलेली आहे. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरवर ४०० रुपयांची सूट देण्यात आलीय.
दरम्यान, याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ७५ लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकाही डोळ्यासमोर आहेत. त्या अनुषंगाने केंद्राने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. देशात विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ही आघाडी एकजुटीने मोदी सरकारला निवडणुकीत तोंड देणार आहे. विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला जाब विचारणार असल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.