LPG Price Hike : होळीपूर्वीच सामान्य माणसाला महागाईचे चटके बसणार आहेत. जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई कमी झालेली असताना मात्र भारतात महागाईचा भडका झाला आहे. गॅस, खते, कॉफी-चहा, कापूस आणि खाद्यतेल यांसारख्या 10 वस्तूंचे दर भारतात दुप्पट झाले आहेत. भारतात घरगुती गैस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत सिलेंडरचे दर 1,102.५0 रुपये, नागपूरला 1,154.50 रुपये, नाशिकला 1,056.50 रुपये झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 14.02 किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. तर 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर 350.50 रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. लोकल टॅक्स कारणाने घरगुती गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑईल कंपन्यानी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा ही नवी दरवाढ करण्यात आली आहे. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.