जगातील सर्वात वृद्ध महिला लुसिली रँडनचं 118 व्या वर्षी निधन

टुलॉन | World’s Oldest Person Passed Away – जगातील सर्वात वृद्ध महिला (World’s Oldest Person) फ्रेंच नन लुसिली रँडन (Lucile Randon Passed Away) यांचं निधन मंगळवारी रात्री झालं आहे. त्या 118 वर्षांच्या होत्या. त्यांनी फ्रान्सच्या (France) टुलॉन शहरात अखेरचा श्वास घेतला. रँडन यांचे प्रवक्ते डेव्हिड टवेला म्हणाले, मंगळवारी पहाटे 2 वाजता लुसिली आपल्याला सोडून गेल्या. त्यांची एकच इच्छा होती की, आपल्या प्रिय भावाला भेटावे. टुलॉनचे महापौर हबर्ट फाल्को यांनी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. (World’s Oldest Person)

गेल्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (World’s Oldest Person) जपानच्या केन तनाका यांचं निधन झालं. त्या 119 वर्षांच्या होत्या. तनाकांच्या मृत्यूनंतर, 118 वर्षीय सिस्टर लुसिली रँडन जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनल्या होत्या. त्यांना सिस्टर आंद्रे या नावानंही ओळखले जाते. त्यांचा जन्म 1904 मध्ये फ्रेंच शहरात अल्सेसमध्ये झाला होता. रँडन 19 वर्षांच्या असताना कॅथलिक बनल्या होत्या आणि आठ वर्षांनंतर त्या नन बनल्या होत्या.

लुसिली रँडन 2021 मध्ये कोरोना संसर्गापासून बचावल्या होत्या. तसंच रँडन यांच्या नर्सिंग होममधील 81 लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, रँडन यांना कोरोनाची बाधा झाली नव्हती.

Sumitra nalawade: