मुंबईने नाणेफेक जिंकली, दोन्ही संघांना करो या मरो !

MI Vs LSG चेन्नई : चेन्नईच्या एम ए चितम्बरम स्टेडीयमवर (M. A. Chidambaram Stadium) पाच वेळा आयपीएल ट्रॉफी (IPL 2023) जिंकलेला मुंबई संघ (MI) आणि लखनऊ संघ (LSG) आज भिडणार आहेत (MI Vs LSG). दोन्ही संघांना हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. हा सामना हरणारा संघ यावर्षीची ट्रॉफी गमावणार आहे. मुंबईचा कप्तान रोहितने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (MI Rohit Sharma Won The Toss And Elected To Bat)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनऊ सुपर जायंट्स (lucknow super giants) मधील हा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाला फायनलला पोहोचण्यासाठी पुन्हा एकदा गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. गुजरात सोबतच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो फायनलला जाईल, त्यांनतर अगोदरच फायनलला पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबत फायनल असेल. यावर्षीची आयपीएल ट्रॉफी कोण घेऊन जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सध्यातरी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI Vs LSG) मधील ही लढत कोण जिंकेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कोणाला गुजरातचा सामना करण्याची संधी मिळते आणि कोणता संघ ट्रॉफी मिळवण्याची संधी गमावेल हे बघणेही तेवढेच उत्सुकतेचे आहे.

Dnyaneshwar: