मुंबई | अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचं आज निधन झालं आहे. अभिनेत्री माधुरीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. स्नेहलता दीक्षित यांचं आज (रविवार) सकाळी साडे आठच्या सुमारास निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वरळी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माधुरीच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती रिक्कू राकेश यांनी याबद्दलची माहिती दिली. स्नेहलता यांनी त्यांच्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर माधुरीनेही अंत्यसंस्काराबाबतचा संदेश दिला आहे. ‘माझी प्रेमळ आई स्नेहलता दीक्षितचं आज सकाळी निधन झालं. मुंबईतील वरळी इथल्या स्मशानभूमीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, असं तिने लिहिलं आहे.