पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांना लागणार मंत्रिपदाची लाॅटरी?

Madhuri MisalMadhuri Misal

पुणे :

मुंबई : (Madhuri Misal’s name in cabinet expansion) शिंदे-फडणवीसांनी सरकार स्थापन करुन जवळपास पाच उलटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. मंत्री आणि पालकमंत्री नसल्याने राज्यातील सामान्य जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत. याच पार्श्वभुमीवर विरोधकांकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत.

रखडलेले पावसाळी अधिवेशन, जवळ आलेला स्वतंत्र दिवस 15 ऑगस्ट आणि विरोधकांच्या सततच्या टिकेमुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. मंगळवार दि. 08 रोजी सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते १७ जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.

या मंत्रीमंडळात पुण्यातील एक नाव सध्या चर्चेत आहे. ते म्हणजे माधुरी मिसाळ यांचे त्या पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. पुण्यातील भाजपचं वजनदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या महापालिकेच्या दृष्टीने सर्व विचार करुन त्यांना या मंत्रीमंडळात संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

.

Prakash Harale:
whatsapp
line