मंत्रिपद अन् नाराज पंकजा मुंडेबाबत महादेव जानकरांचं मोठं विधान! म्हणाले…

मुंबई : (Mahadev Jankar On Pankaja Munde) दीड महिना रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला काही आमदारांना शपथ देत पार पडला. यावेळी शिंदे गटातील अनेकांना संधी मिळाली मात्र, भाजपच्या दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. पुढील विस्तारात स्थान मिळेल या प्रतिक्षेत अनेक नेते पक्षाकडे लाॅबिंग लावत आहेत.

दरम्यान, यानेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील डच्चू देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आले असता, त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आमचा पक्ष एनडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात रासपलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. अशी अपेक्षा त्यांनी भाजपकडे बोलून दाखवल्याचं सांगितलं.

यावेळी जानकरांनी नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आमच्या भगिनी पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. त्यांच्या वडीलांचं संपुर्ण आयुष्य भाजपमध्ये गेलं. त्यामुळे पक्ष सोडून त्या कुठेही जाणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षात सुरु असतो. असे जानकरांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीनं पंकजा मुंडेंना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे त्या राष्ट्रवादीत जाणार की काय अशा असणाऱ्या चर्चेला आता पुर्णविराण मिळाला आहे.

Prakash Harale: