महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी

पुणे | नुकतीच कोथरूड येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले. मारुती सातव यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला. मल्ल सिकंदर शेख याच्याशी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चार गुण बहाल केल्याचा आरोप अज्ञाताने मोबाईल वर बोलताना केला. त्याचप्रमाणे मारुती सातव यांनी त्या अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले आहे.

मारुती सातव यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार केली आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोडवे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. या प्रकरणात सातव यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

Dnyaneshwar: