आता ‘अहमदनगर’ नाही तर‘अहिल्यानगर’; महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी

आता 'अहमदनगर' नाही तर‘अहिल्यानगर’

अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान आता अहमदनगर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने याबाबा अधिसूचना काढली आहे. राज्य सरकारने राजपत्र जारी केल्याने आता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे.

अहमनगरचे  नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार आज राज्य शासनाच्या राजपत्रात त्याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता अहमदनगर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी चोंडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. दरम्यान अहमदनगरचे अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Rashtra Sanchar: