शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 18 आमदार शपथबद्ध!

मुंबई | Maharashtra Cabinet Expansion – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला आहे. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हाॅलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.  

भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवापसी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, तानाजी सावंत, संजय राठोड, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.

या शपथविधी सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.

Sumitra nalawade: