प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान

Maharashtra Chitrarath 2023 : प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाच्या बहुमान मिळाला आहे. 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. तर उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर आला आहे. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली होती. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती या चित्ररथात करण्यात आली होती. या चित्ररथावर गोंधळी होते आणि त्यांच्या हातात संबळ हे वाद्य दाखवलेलं आहे. हे सगळे तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर आहेत. त्यावर दाखवण्यात आलेली सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या प्रतिमांचे भव्य आणि दर्शन कर्तव्यपथापवर झाले आहे.

Dnyaneshwar: