महाराष्ट्र केसरी : कुस्तीची दंगल धाराशिवमध्ये रंगणार; तारखा जाहीर, कोट्यावधींची बक्षिसे अन् बरच काही..

Maharashtra Kesari Wrestling Tournament : धाराशिवमध्ये ६५ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेची दंगल धाराशिवमध्ये रंगणार आहे. त्यामुळे खूप वर्षाने ही मराठवाड्यातील नागरीकांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. आज झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने ही घोषणा केली आहे.

दरम्यान, या स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या असून १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान हा कुस्त्यांचा थरार पार पडमार आहे. धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदा या स्पर्धेचा मान मिळाला आहे.

एकूण पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे. धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ या स्पर्धेचं आयोजन करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. जवळपास ९०० खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून विजेत्यांना स्कॉर्पियो, टक्टरसह २ कोटीं रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहेत. १८ बुलेट देखील विजेत्यांना दिल्या जाणार आहेत.

Prakash Harale: