रखडलेल्या अधिवेशनाला अखेर मिळाला मुहूर्त, ‘या’ तारखेपासून होणार पावसाठी अधिवेशनाला सुरूवात

मुंबई | Maharashtra Monsoon Session Of Legislature Starts From 17th August – राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन बुधवार (17 ऑगस्टपासून) सुरू होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज (11 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

दरम्यान, अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत होणार असून यामध्ये शुक्रवार (19 ऑगस्ट) रोजी दहीहंडी सुट्टी आणि 20, 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. तसंच 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.

Sumitra nalawade: