“पोशाख, वेळ अन् मोबाईलविषयी खास सूचना”; देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर

महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस गुरुवारी  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पत्र आल्याचे चित्र समोर आले आहे.

उद्या पार पडणार शपथविधी  

त्यानुसार उद्या मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी होणार आहे. या ऐतिहासिक मैदानात पंतप्रधान मोदींसोबत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. पंकजा मुंडे व प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिले.

नाव जाहीर होताच भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी फडणवीस पगडी घालून खुश दिसत होते. भाजपने विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचे आभार
विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याला मोठे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे. आम्ही कोणाला एकटे घेत नाही, सर्वांना सोबत घेत आहोत. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही तयार आहोत. ते म्हणाले की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मनापासून आभार मानतो.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. ऑक्टोबर 2014 पासून ते पाच वर्षे पहिल्यांदा मुख्यमंत्री होते. ते 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 या कालावधीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होते. त्यानंतर आता ते उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Rashtra Sanchar: