महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार बंडाच्या तयारीत?

मुंबई | Ajit Pawar – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपला (BJP) साथ देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार आहे. त्यामुळे आता या 40 आमदारांसह अजित पवार बंड करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या (NCP) 53 आमदारांपैकी 40 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. तसंच या आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे असून ते वेळ आल्यावर राज्यपालांकडे पत्र देणार असल्याचंही समजंतय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

“आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. आमदारांनी स्वाक्षरी केलेली ही यादी वेळ आल्यावर राज्यपालांना सादर केली जाईल,” अशी माहिती पक्षातील एका चांगल्या सूत्राच्या हवाल्यानं द न्यू इंडियन एक्प्रेसला दिली असल्याचं समजतंय. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काय भूकंप होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sumitra nalawade: