मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’, राज्यभर काय परिस्थिती वाचा सविस्तर..

Maharashtra Rain Update News : राज्यात कालपासून मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवली परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत आज पावसाची तिव्रता वाढली आहे. आज मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. घाटकोपर, कुर्ला, मरीन ड्राईव्ह, अंधेरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. हवमान विभागाने संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नाशिमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच विदर्भात पुढील २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Prakash Harale: