मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari Resign) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Dropadi Murmu) यांनी मंजूर केला आहे. भागात सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महाराष्ट्रातील अनेक नेते आणि नागरिक देखील संतापलेले होते. महाराष्ट्रातील आदर्शांचा अपमान करत असल्याचा कोश्यारी यांचावर आरोप केला जात होता. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात निदर्शने आणि आंदोलने देखील करण्यात आली होती. अखेर आता कोश्यारींची महाराष्ट्रातून सुट्टी झाली आहे. त्यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया यात आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे नेते आनंदी दिसत आहेत.
पाहा कोण काय म्हणाले?
शरद पवार (Sharad Pawar OnBhagat Singh Koshyari’s Resignation) : “माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली होती, ती आपण पाहिली. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यात बदल केला, ही समाधानकारक बाब आहे.”
आदित्य ठाकरे (Aditya Thackerey On Bhagat SinghKoshyari’s Resignation: महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाही आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्याला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही!
संजय राऊत (Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari’s Resignation: राज्यपालांनी भाजपचे राजभवनातील एजेंट म्हणून काम केलं. त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांना राज्यपालांनी मंजुरी दिली नाही. मी, त्यांना दोष देत नाही, ते भाजपच्या दबावाखाली काम करत होते. भाजपने महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील आदर्शांचा अपमान करण्यासाठीच कोश्यारींना महाराष्ट्रात पाठवले होते. याची इतिहासात नोंद होईल.”
रावसाहेब दानवे (Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari’s Resignation: भगतसिंह कोश्यारी यांनी फक्त राजभवनात बसून कारभार हाकला नाही. ते ग्रामीण भागात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. हे त्याकाळच्या महाविकास आघाडी सरकारला हे मान्य नव्हत. शेवटी कोश्यारी यांनी राजीनामा दिला.
पृथ्वीराज चौहान (Pruthwiraj Chouhan On Bhagat Singh Koshyari’s Resignation: राज्यपाल यांना राज्याच्या सरकारच्या कामदा हस्तक्षेप करण्याचं काम नसतं मात्र, भगतसिंह कोश्यारी हे पूर्णपणे राजकारणी असल्याने ते कायम हस्तक्षेप करत राहिले. त्यांचा हस्तक्षेप देखील निःपक्षपाती नव्हता. त्यांनी महाविकास आघाडीच्या १२ आमदारांची नियुक्ती करायला लांबणीवर टाकले. कोश्यारी वरून येणाऱ्या आदेशांवर काम करत होते.
रोहित पवार (Rohit Pawar On Bhagat Singh Koshyari’s Resignation: उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन! ते संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा! त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
अमोल मिटकरी (Amol Mitkari On Bhagat Singh Koshyari’s Resignation: उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली.. महाविकास आघाडी च्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule On Bhagat Singh Koshyari’s Resignation: देर आये दुरुस्त आये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान सातत्याने कोश्यारींनी केला. हे खूप दुर्दैवी झालं. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही. कोश्यारी म्हणजे राज्यपाल कसा नसावा याचं उत्तम उदाहरण.
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati On Bhagat Singh Koshyari’s Resignation): कोश्यारींचा राजीनामा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, जे चुकतील त्यांना ठोकणार.
नाना पाटोले (Nana Patole OnBhagat Singh Koshyari’s Resignation🙂 भाजपने कोश्यारींकडून महाराष्ट्राची बदनामी करून घेण्याचं काम केलं. बदनामी करण्याचं काम पूर्ण झालं असं भाजपला वाटलं असेल, म्हणून त्यांनी आता कोश्यारींना पदावरून हटवले.