शिंदे गटात पडली फुट? आमदार नाराज, बोलता बोलता बरंच बोलून गेले!

सातारा : (Mahesh Shinde On Shambhuraj Desai) शिंदे सरकार स्थापनेला १०० दिवस झाल्याच्या असतानाच, सातारा जिल्ह्यातून शिंदे गटातल्या नाराजीचीच बातमी आलीये. कोरेगावचे आमदार महेश शिंदे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर नाराज आहेत. गेल्या महिनाभरापासून साताऱ्यात तशी कुजबूज सुरुये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातच शिंदे गटात नाराजीचा स्फोट होऊन गट फुटण्याची चिन्हे असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होता येत.

याबाबत आमदार महेश शिंदे यांना विचारले असता माझी शंभूराज देसाई यांच्यावर कोणतीही नाराजी नाही, असं सांगत अपेक्षा तर प्रत्येकालाच असते. ज्याचं नशीब असतं, त्यालाच मिळतं. मी माझं काम करत राहतोय, याचा रिझल्ट मला शंभर टक्के मिळणार, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र महेश शिंदे यांनी दिलेल्या उत्तरातच अस्वस्थता जाणवत असल्याचं दिसून आलं.

आमदार महेश शिंदे हे अॅग्रेसिव्ह नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र साताऱ्यात काम करत असताना पालकमंत्र्यांचा हवा तेवढा सपोर्ट मिळत नसल्याने महेश शिंदे नाराज असल्याच्या चर्चा शिंदे गटात दबक्या आवाजात सुरु आहे. जर ही नाराजी जास्त काळ टिकली तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यातच गट फुटण्याची चिन्हे निर्माण होतील, असंही पदाधिकारी खासगीत म्हणतायेत.

Prakash Harale: