बच्चू कडूंच्या विरोधात गुन्हा दाखल! “रवी राणांच्या आईवर मी काहीही…” बच्चू कडूंची प्रतिक्रिया

अमरावती (BACHHU KADU VS RAVI RANA) : शिंदे सरकारला पाठिंबा देणारे प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू (PRAHAR JANASHAKTI BACHHU KADU) आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद वाढतच चाललेला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर पैसे घेऊन सरकारला पाठिबा दिल्याचा आरोप केला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी राणा यांनी आरोप सिध्द करावेत म्हणून सांगितले आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणाला समजून सांगण्याची मागणी केली आहे. जर रवी राणा आरोप करत राहिले तर मी शांत बसणार नाही. मला सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. त्यामुळे आमच्या अस्तितावर प्रश्न निर्माण झाला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रकरणात बोलताना बच्चू कडू यांनी महिला आणि तृतीयपंतींचा अपमान केल्याचा आरोप महिला मुक्ती मोर्च्याने केला आहे. (MAHILA MUKTI MOTCHA FILES COMPLAINT AGAINST BACHHU KADU)

या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात (RAJAPETH POLICE STATION AMARAVATI) बच्चू कडू यांच्या विरोधात पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार बचू कडू यांनी महिलांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप महिला मुक्ती मोर्च्यानं केला आहे. एका बापाची औलाद असाल तर आम्ही पैसे घेतल्याचे पुरावे द्या. असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं.

दरम्यान, बच्चू कडू यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “रवी राणा अशाप्रकारे इतरांमार्फात तक्रार दाखल करत आहेत… मी रवी राणांच्या आईवर बोल्लेलो नाही… रवी राणांनी घाणेरडे राजकारण करू नये… मी रवी राणावर ५० कोटीचा दावा ठोकणार आहे..” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावर दिली आहे.

Dnyaneshwar: