“मुलीचा जन्म त्यानंतर दोन वेळा गर्भपात…”, महिमा चौधरीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा!

मुंबई | Mahima Chaudhary’s Revelation About Private Life – 90च्या दशकातील अभिनेत्री महिमा चौधरी ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आज तिचा 49 वा वाढदिवस आहे. महिमानं ‘परदेस’ या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती तिच्या दमदार अभिनयामुळं नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यासोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. महिमाला खासगी आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोर जावं लागलं आहे. काही महिन्यांपूर्वीच आपल्याला स्तनाचा कर्करोग झाला असल्याचं तिने सांगितलं होतं. तसंच आता महिमानं तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

काही वर्षांपूर्वी महिमा आणि टेनिस पटू लिएंडर पेस हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र काही काळानंतर महिमा-लिएंडरमध्ये काहीतरी बिनसलं आणि या नात्याचा दी एण्ड झाला. त्यानंतर व्यावसायिक बॉबी मुखर्जीबरोबर महिमानं 2006 मध्ये लग्न केलं. पण महिमाचं हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. 2013 मध्ये बॉबी-महिमा विभक्त झाले.

दरम्यान, महिमानं बाॅलिवूड बबला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “2007मध्ये माझ्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर दोनवेळा मी गर्भपाताचा सामना केला. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मला कुठे चित्रीकरणासाठी किंवा शोसाठी जायचं असेल तर माझी आई माझ्या मुलीचा सांभाळ करायची. माझ्या आईने माझ्या पडत्या काळामध्ये मला पाठिंबा दिला.” महिमा या सगळ्या प्रसंगांमधून सुखरुप बाहेर आली. पण काही महिन्यांपूर्वी तिला स्तनाच्या कर्करोगाशी सामना करावा लागला. आता कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामधून महिमा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

Sumitra nalawade: