मुंबई : शनिवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मात्र यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताना पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली आहे. यासंर्दभात आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, “बाळासाहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करुं तो साला तो साला, कॅरेक्टर ढीला है”. तसंच त्याचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे.