Manipur Violence : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारानंतर रोष उफाळला, मुख्य आरोपीच्या घराला आग

Manipur Violence Update – मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दोन महिलांना भररस्त्यात विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली, तसंच त्यांच्यावर सामुहिक बलात्कार देखील करण्यात आला. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायर झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका जमावानं दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचं दिसलं. तसंच तो जमाव त्यांना एका शेतात घेऊन जाताना दिसला. यावेळी जमावातील काही लोक पीडित महिलांच्या शरीराला ओरबाडत, मारहाण करत त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचंही दिसले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

तसंच, आता या पीडित महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर जाळण्यात आलं आहे. काही अज्ञातांनी मुख्य आरोपीच्या घराला आग लावल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. तसंच आरोपीच्या घराला आग लावतानाचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. या संतप्त घटनेनंतर मणिपूरमधील रोष आणखी उफाळला आहे.

admin: