मलायका-अर्जुन लवकरच उरकणार साखरपुडा? ट्विटमुळे चर्चांना उधान

मुंबई | मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. मलाइकाचे पहिले लग्न 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. हे लग्न 19 वर्षे टिकले, त्यानंतर अरबाज आणि मलायका घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर 2019 मध्ये मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे नाते उघड केले. मलायकाने 12 वर्षांनी लहान अर्जुनसोबतचे नाते उघड करताच तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. यासोबतच दोघांच्या साखरपुडा आणि लग्नाच्या बातम्या नेहमीच व्हायरल होत असतात. या दोघांना लग्नबंधनात अडकलेलं पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाची आणि साखरपुड्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दोघांच्या साखरपुड्याबाबत एका ट्रेड एक्स्पर्टने सोशल मीडियावर ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान ट्रेड एक्सपर्ट उमेर संधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक बातमी शेअर केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मलायका आणि अर्जुनचा फोटो शेअर करत उमेरने लिहलंय की, ‘ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये साखरपुडा करणार आहेत.’या ट्विटनंतर मलायका-अर्जुन सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहेत.

Dnyaneshwar: