“रात्री तीन वाजता फोन करून…”, मल्लिका शेरावतचा बाॅलिवूडबाबत धक्कादायक खुलासा!

मुंबई | Mallika Sherawat’s Shocking Revelation About Bollywood – बाॅलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ही बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसंच ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. मल्लिका नेहमी बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमधील कास्टिंग काउच आणि त्यादरम्यान मल्लिकाला आलेला अनुभव तिने सांगितला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मल्लिकाने सांगितलं की, ” ए लिस्टमधील सगळ्याच अभिनेत्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला. कारण मला कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड करणं योग्य वाटत नव्हतं. जी अभिनेत्री त्यांच्या दबावामध्ये राहील त्याच अभिनेत्री या कलाकारांना आवडायच्या. पण मी तशी नाही. माझं व्यक्तिमत्त्व त्या पद्धतीचं नाही.”

पुढे बोलताना मल्लिका म्हणाली, “इतरांच्या इच्छेनुसार मी वागू शकत नाही. जर एखाद्या अभिनेत्याच्या चित्रपटामध्ये तुम्ही काम करत आहात आणि त्याने तुम्हाला रात्री तीन वाजता फोन करून घरी बोलावलं तर तुम्हाला जावं लागतं. पण त्याचवेळी तुम्ही त्याच्या घरी गेला नाहीत तर चित्रपटामधून तुम्हाला बाहेर काढलं जाणार हे नक्की.” मल्लिकाचं हे वक्तव्य सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. 

Sumitra nalawade: