मुंबई | Mallika Sherawat Statement In Discussion – मल्लिका शेरावतला बाॅलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तसंच ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आता ती आगामी चित्रपट ‘आरके/आरके’मुळे चांगलीच चर्चेत आहे. तसंच चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तिने केलेल्या बोल्ड वक्तव्यांचीही सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. आताही नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मल्लिकानं एक विधान केलं आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
मल्लिकानं एका मुलाखतीत म्हटलं आहे की, माझं ग्लॅमर प्रेक्षकांसाठी जास्तच शानदार होतं. मी ‘मर्डर’मध्ये बिकिनी घातली होती आणि त्याआधी कोणत्याच अभिनेत्रीनं असं केलं नव्हतं. मी त्यावेळी खूपच बिनधास्त होते आणि माझ्याकडे बिकिनीसाठी उत्तम फिगर आहे हेच माझ्या डोक्यात होतं.”
तुम्हाला काय वाटतं, मी बीचवर साडी नेसणार आहे का? नाही, अर्थातच मी बिकिनी घालेन. मी ते सेलिब्रेट करते. लोकांना हे पचवणं कठीण जातं. विशेषत: महिलांना हे स्वीकारणं सर्वाधिक कठीण गेलं असं मला वाटतं. मला पुरुषांमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. भारतीय पुरुषांनी मला खूप प्रेम दिलं आहे. पण काही महिला मात्र माझ्याबद्दल खूपच चुकीचे विचार करतात,”असं देखील मल्लिका म्हणाली.