मुंबई : (Mamta Banrjee On Amitabh Bacchan) तृनमूलच्या सर्वासर्वे ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईत आलेल्या ममता बॅनर्जी या बाॅलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी दाखल झाल्या असून, त्यांनी अमिताभला राखी बांधली आहे. त्यामुळे कलाकर अन् राजकिय नेत्यामध्ये नात्याची वीण विनली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा ममता दीदीने बच्चन कुटुंबाचे घर गाठले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, बच्चन कुटुंबाचे कला क्षेत्रात मोठं योगदान आहे. बच्चन कुटुंबाकडून देखील त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे.