मंदिरा बेदीनं क्रिकेट विश्वाबद्दल केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, “क्रिकटर्स मला वाईट नजरेनं पाहायचे अन्…”

मुंबई | Mandira Bedi – आज (15 एप्रिल) प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) वाढदिवस आहे. मंदिरा बेदी ही नेहमीच चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीतही मंदिरा बेदीनं तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं आहे. तसंच तिनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच मंदिरा क्रिकेट विश्वातही दिसून आलीये.

मंदिरा बेदी मॅच झाल्यानंतर क्रिकेटर्सच्या मुलाखती घेण्याचं काम करते. तर तिनं एका मुलाखतीत या क्षेत्रातील तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. मंदिरानं 2003 ते 2007 या काळात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली की, “क्रिकेटर्सला वाटायचं की मी एका वेगळ्याच जगातून आले आहे. चॅनेलनं मला सांगितलं होतं की जे तुझ्या मनात येईल ते विचार. पण मला काहीच समजत नाही, या नजरेनं क्रिकेटर्स मला पाहायचे.”

“सोनी टीव्हीनं माझी 150 ते 200 महिलांमधून निवड केली होती. त्यामुळे मला खुप भारी वाटत होतं. मी विचार करायचे की, मला काहितरी चांगलं बोललं गेलं पाहिजे. पण क्रिकेटर्स माझ्याकडे नेहमी वाईट नजरेनंच पाहायचे”, असा खुलासा मंदिरानं केला होता.

Sumitra nalawade: