मंगळुरूसाठी विमानसेवा सुरु करण्याची घोषणा

पुणे : पुणे विमानतळाने हिवाळी वेळापत्रकात या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन केले होते. इंडिगो एअरलाइन्सने पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमानसेवा गेल्या महिन्यात सुरू केली. याचबरोबर इंडिगोनेच पुणे ते दुबई थेट विमानसेवा सुरू केली आहे. आता एअर इंडिया एक्स्प्रेसने पुणे – बँकाक थेट विमानसेवा सुरु केली आहे. याचबरोबर एअर इंडिया एक्स्प्रेसने पुण्यातून मंगळुरूसाठी थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणाही केली आहे. पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणांमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. पुण्यातून बँकॉकसाठी थेट विमानसेवा नोव्हेंबरमध्ये सुरू झाली होती. यात आता आणखी एका आंतरराष्ट्रीय उड्डाणाची भर पडली आहे.यामुळे पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या आता पाच झाली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसची पुणे बँकॉक सेवा गुरुवार, शुक्रवार, शनिवारी असेल. हे विमान पुण्यातून सकाळी ८.४० वाजता उड्डाण करेल आणि दुपारी २.३० वाजता बँकॉकमध्ये पोहोचेल. हे विमान बँकॉकमधून दुपारी ३.३५ वाजता उड्डाण करेल आणि पुण्यात सायंकाळी सहा ६.२५ वाजता पोहोचेल.

Rashtra Sanchar Digital: