Manipur Violence : मणिपूरात अग्नितांडव शांत ? ५४ जणांचा मृत्यू पाहा काय आहे स्थिती ?

मणिपूर : मागील पाच ते सहा दिवसांपासून मणिपूरमध्ये वांशिक भेदावरून हिंसाचार (ManipurViolence) सुरु आहे. आत्तापर्यंत तब्बल ५४ जणांचा मृत्यू याठिकाणी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो असं देखील म्हटलं जात आहे. तसेच १०० हून अधिक जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.

मणिपूर हिंसाचार (ManipurViolence) नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे 10,000 तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे शनिवारी बहुतांश स्थिती नियंत्रणात आली आहे. लष्कराने तणावग्रस्त भागात अडकलेल्या 13,000 लोकांना बाहेर काढले आणि त्यांना छावण्यांमध्ये हलवले आहे. लष्कराच्या पीआरओने सांगितले की, सुरक्षा दलांनी हिंसाचारग्रस्त भागातील विविध अल्पसंख्याक भागातील लोकांची सुटका केली. चुराचंदपूर, कांगपोकपी, मोरे आणि ककचिंगमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे.

काय आहे प्रकरण ?

मणिपुरात मेईती समुदायाने त्यांची परंपरा, संस्कृती आणि भाषा वाचवण्यासाठी मेईती समुदायाला आदिवासींचा दर्जा द्यावा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. मेईती समुदायाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टाने निकाल सुनावला. हायकोर्टाने 14 एप्रिल रोजी दिलेल्या निकालानंतर मणिपूरमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. या समुदायाला आदिवासींमध्ये समाविष्ट करून केंद्र सरकारला तशी शिफारस करावी असे आदेश हायकोर्टाने दिले. मात्र, हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर सर्व आदिवासी समूह याच्याविरोधात रस्त्यावर उतरले. कुकी आणि नागा समुदायाने मेईती समुदायाचा आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास विरोध केला.

Dnyaneshwar: