मणिपूर पेटत आहे; ते वाचवावं लागेल!

मणिपुरात हिंसा भडकण्याचं तात्कालिक कारण असं…

मणिपुरी लोक इथं जास्त म्हणजे ५३ टक्के आहेत. नागा जाती २४ टक्के व कुकी जमाती १६ टक्के आहेत. उरलेले सात टक्के लोक बाकीचे आहेत. यामध्ये निव्वळ आदिवासी समुदाय ४१ टक्के आहे.

मणिपूर… (Manipur) भारताचा एक अविभाज्य भाग. या राज्याचे क्षेत्रफळ २२,३२७ किमी आहे. तशीच लोकसंख्या २७,२१,७५६ एवढी आहे. या राज्यात अनेक जातींचे व धर्माचे लोक राहातात. ज्यात कुकी, जोमी व मैतेई या समाजांचाही समावेश आहे. तसंच ज्यात मैतेई हे अल्पसंख्याक लोक राहातात की, जे स्वतःला उच्च समजतात आणि कुकी व जोमी या जातींना कनिष्ठ.

मणिपूर भारत देशात ईशान्य भागाला वसलेलं राज्य आहे. या राज्याच्या लगत उत्तरेस नागालॅंड, पश्चिमेस आसाम, पूर्वेस म्यानमार व दक्षिणेस मिझोराम आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी आहे. मणिपुरी ही येथील भाषा असून, येथील साक्षरता चांगलीच म्हणजे ७९.८५ टक्के आहे. तरीही या राज्यात बलात्काराची घटना होते आणि या घटनेवर उत्तर हे बलात्कारानंच दिलं गेलं आहे. म्हणूनच हे हिंसक वातावरण. मात्र हिंसक वातावरण निर्माण होण्यापूर्वी इथे बलात्कार झाला की नाही झाला? झाला तर त्याला हिंसक रूप देण्यापूर्वी त्याची तक्रार पोलीस स्टेशनला का केली नाही? कदाचित तो कथित बलात्कार तर नाही? असे अनेक प्रश्न आहेत. ज्याची उत्तरं आजही सापडलेली नाही. तरी आजही तेथे हिंसक वातावरण सुरूच आहे आणि त्याचे पडसाद पूर्ण भारतात उमटत आहेत. स्त्रियांच्या इज्जती वेशीवर टांगलेल्या असून, त्यांना हात बांधून व डोळे बांधून मारले जात आहे. तसेच तुम्हीच कपडे काढा. नाहीतर मारून टाकू, असाही दम दिला जात आहे. बलात्कार तर रोजचाच आहे. कधी या जातींचा तर कधी त्या जातींचा.

पूर्वी मणिपूर हे एक संस्थान होते. १९३० ला मणिपूर राज्याने ब्रम्हदेशाचा भाग होण्याऐवजी भारताचा भाग होणं स्वीकारलं. त्यासाठी लोकांनी संस्थानिकांवर दबाव आणला. हा लढा सन १९३९ नंतर अधिक तीव्र करण्यात आला व ११ ऑगस्ट १९४७ ला राजा बुधचंद्र याने भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर २१ सप्टेंबर १९४९ ला विलीनीकरण स्वाक्षरी झाली व मणिपूर हे भारताचा भाग बनले, परंतु हे विलीनीकरण काही लोकांना मान्य नव्हते. त्यामुळंच सत्तासंघर्ष सुरूच राहिला.
मणिपुरी लोक इथं जास्त म्हणजे ५३ टक्के आहेत. नागा जाती २४ टक्के व कुकी जमाती १६ टक्के आहेत. उरलेले सात टक्के लोक बाकीचे आहेत. यामध्ये निव्वळ आदिवासी समुदाय ४१ टक्के आहे. तसंच लगतच्या मिझोराम राज्याशी या राज्याचे मित्रत्वाचे संबंध आहेत. तशीच कुकी आणि जोमी जनजातीशी त्यांची रिश्तेदारीही आहे.

मणिपुरात हिंसा भडकण्याचं तात्कालिक कारण असं. गत काही दिवसांपूर्वी इथं दोन बलात्कार झाले. त्यात दोन महिलांना निर्वस्त्र करून फिरविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला व तो बलात्कार का केला, असं विचारलं असता कारण सांगण्यात आलं की, यांनी आमच्या समुदायातील एका महिलेवर आधी बलात्कार केलेला आहे. त्यामुळंच आम्ही बलात्कार केलाय. घटना अशी. तो ४ मे चा दिवस. तो कांगपोकपी जिल्हा. त्या दिवशी त्या जिल्ह्यातील एका गावात अचानक जमावानं हमला केला. त्यानंतर त्या जमावातील तीन महिला व दोन पुरुष भयभीत होऊन जंगलात पळाले, परंतु जमाव एवढ्यावरच थांबला नाही. त्या जमावातील काही लोकांनी या पाचही जणांचा पाठलाग केला. त्यातच पोलीसही त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या मागावर होते. हे पाचही जण जंगलात पळून जाताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं व संरक्षण दिलं, परंतु पोलिसांची ताकद कमी पडली व या जमावानं पोलिसांच्या ताब्यातून या पाचही जणांना ताब्यात घेतलं व त्यातील दोन पुरुषांची हत्या केली.

जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी दोन महिलांना निर्वस्त्र केलं. त्यांना निर्वस्त्र स्वरूपात फिरवलं. त्यावेळेस त्यांनी दयेची भीक मागितली, परंतु जमावानं ते ऐकलं नाही व त्यानंतर त्यांच्यावर एकामागोमाग एक असा सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांची नृशंस हत्याही केली. तसाच त्या घटनेचा व्हिडीओही बनवला. म्हणतात की, ही घटना पूर्वीच घडून गेली व व्हिडीओ नंतर व्हायरल केला गेला. ही घटना यासाठी करण्यात आली असावी. कदाचित लोकांवर आमच्या समुदायाबद्दल धाक निर्माण व्हावा व कोणताही आदिवासी समुदाय आमच्या वाट्याला जाऊ नये, हे या घटनेमागील राजकारण. सत्य काय आहे हे मणिपूरच्याच जनतेला माहीत. म्हणतात की, यात तीन महिला होत्या, परंतु एक महिला व्हिडीओत दिसत नाही. त्यानंतर जसा हा व्हिडीओ व्हायरल झाला, तसे घटनेचे पडसाद उमटले. त्यानंतर या घटनेनं केवळ आदिवासीच नाही तर संपूर्ण भारत देशातील नागरिक खवळले. शोक व्यक्त झाले. कात्र्या लावल्या गेल्या, परंतु जमाव पांगेल तेव्हा ना. ना कुकी व जोमी जमातीची मंडळी ऐकत आहेत, ना मणिपूरमधील इतर जातीचे लोक ऐकत आहेत. यात मिझोराम या लगतच्या राज्याचा काहीही दोष नाही. ना तेथील मैतेई लोकांचा. तरीही मिझोराम राज्यातील पीस अकॉर्ड एम एन एफ रिटर्नीज असोसिएशन PAMRA या उग्रवादी संघटनेने येथील मैतेई लोकांना धारेवर धरले आहे. जे अल्पसंख्याक असून, त्यांची मिझोराममधील संख्या फक्त दोन हजार आहे. म्हणतात की, आता या सामूहिक बलात्काराच्या घटनेत मिझोराममधील लोकांशी असलेले मणिपूरमधील कुकी व जोमी या जमातीचे हितसंबंध कारणीभूत आहेत. आता या मिझोराम मधील बरेचसे मैतेई लोकं आसाममध्ये स्थलांतर करीत आहेत.
(पूर्वार्ध)

या घटनेचं तात्कालिक कारण असं की त्यांना PAMRA या उग्रवादी संघटनांनी एक धमकीच दिली की जर आपण मिझोराम मध्ये दिसाल तर एक एक निवडू निवडू मारु. मग आम्ही विचारही करणार नाही. त्यामुळंच की काय मिझोराममध्ये राहणारे हे मैतेई अल्पसंख्याक लोकं आसाम या लगतच्या राज्यात स्थलांतर करीत आहेत. ज्यात विद्यार्थी व प्रोफेसर सुद्धा आहेत. तसेच मणीपूर मध्ये राहणारे मिझोराम वर्णीय लोकं मिझोरामला स्वगृही परतत आहेत.

वर्गसंघर्ष…… जातसंघर्ष……. धर्मसंघर्ष ……. ह्या पुर्वापार चालत आलेल्या गोष्टी. ही किडच लागली आहे काही लोकांच्या विचारांना. सडक्या मेंदूत लागलेली सडकी किड. कोणता चांगला विचार प्रसवणार ही सडकी किड. काही लोक असेच सडक्या विचारांचे असतात. तेच सडके विचार प्रसवतात व त्या विचारांचा प्रसार करतात. ज्यात चांगलेही फसतात व तेही बळी ठरतात. त्यामुळं अशा घटनांना किंबहुना थांबविता येणे शक्य नाही. वर्चस्वाच्या लढाईतून हे घडत असलेलं कृत्य. त्यांना कधी चांगलं सुचनारच नाही.

धर्म जाती आणि वर्ग. आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहेत. हो, धर्म वाढवा ना. कुणी अडवलं, कुणी मनाई केली? जात जोपासा ना. कुणी मनाई केली? धर्माचा व बलात्काराचा संबंध नाही. जातीचा व बलात्काराचा संबंध नाही. बलात्कार करणारा हा काही कोणत्याही धर्माचा वा जातीचा वा वर्णाचा होवू शकत नाही. तरीही कथीत बलात्कार सादर करुन मणीपूर काही तुरळक सडक्या विचारांच्या माणसांनी पेटवला आहे व त्याला जातीय रंग देवून कुकी व जोमी जातीच्या स्रियांवरच बलात्कार केले आहेत व करीत आहेत. त्यातच कुकी व जोमी जमातीचेही समुदाय कमजोर नाहीत. तेही बलात्काराचा बदला बलात्कारानेच घेत आहेत. स्रिया तर अशा दोन्ही समुदायांची कळसुत्री बाहूली ठरलेली आहे. त्यातील पुरुषही मारले जात आहेत आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल केला जात आहे नव्हे तर याला जातीचा रंग अगदी हुबेहुब मारला जात आहे की मणीपूर पेटत राहावं व त्याचबरोबर आजुबाजूचे राज्य. तसाच संपूर्ण भारत देशही पेटावा अशीच चिन्हं दिसत आहेत. म्हणजेच आपल्याला मजा येईल. आपली पोळी भाजता येईल. असा देखावा. अगदी चित्रपटाला शोभेल असंच कथानक. मुळात असा हा जातीय संघर्ष आज मणीपूरातच नाही तर आजपर्यंत देशात कित्येक ठिकाणी पाहिला. तसाच बराचसा धर्म संघर्षही देशानं अनुभवला आहे आणि अनुभवत आहे.

महत्वाचं सांगायचं म्हणजे खरंच मणीपूर असा जातीय दंगलीनं पेटावा का? आपण पेटू द्यावा का? भारत माझा देश असतांना व सारे भारतीय माझे बांधव असतांना त्या ठिकाणच्या स्रिया आपल्या आपल्या भगिनी नाहीत का? कशाला हवेत असे जातीय संघर्ष आणि असे धर्मसंघर्ष? कशाला हवा असा हिंसाचार? यानं काय आनंद मिळतो का? अन् ज्याला आनंद मिळत असेल, त्याच्यासारखा कोणी मुर्ख नाही व त्याला या देशात राहण्याचाही काही अधिकार नाही. कारण हा देशच मुळात गौतम बुद्धाच्या विचाराचा आहे. ज्यांच्या विचारानं प्रेरीत होवून सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर हिंसेला पूर्णविराम दिला. हा देश म. गांधीच्या विचारांचा आहे. ज्यांनी विना शस्राविणा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हा देश त्या लोकांच्या विचारांचा आहे की ज्यांनी हसतहसत फाशी घेतली. परंतु विरोध वा हिंसा केली नाही वा हिंसक वातावरण तयार केले नाही. बलात्काराचा बदला बलत्कारानच घेतला नाही. स्रियांना कधीच कळसुत्री बाहुली बनवून छळलं नाही. त्यामुळं मणीपूरच्या जनतेला विशेष सांगायचं म्हणजे हिंसा करण्यापुर्वी आठवा त्यांना की जालियनवाला बागेत जनरल डायरच्या गोळ्यांचे भारतीय लोकं शिकार झाले होते. परंतु तरीही हिंसा घडवली नव्हती वा कोणावर बलात्कार केले नव्हते. मग आजच का गरज येवून पडली? हिसेचा बदला हिंसा आणि बलात्काराचा बदला बलात्कारानं घेण्याची आणि असंच जर सुरु राहिलं तर आज मणीपूर पेटत आहे, उद्या देश पेटेल, यात शंका नाही.

विशेष सांगायचं म्हणजे मुळात आज हिंसा बंद व्हावी. मणीपुरातीलच नाही तर संपुर्ण देशातील. नाही तर उद्या या देशाला काहीच अर्थ उरणार नाही व हा देश कधी कोणाचा गुलाम होईल हेही सांगणे कठीण जाईल. कारण राज्य वा देश बुडायला आपसातील वादच कारणीभूत असतात हे आपण आपल्या पुर्वजांपासूनच अनुभवलं आहे. तसा इतिहास आपण शिकलेलो आहोत. हे आपण आठवायला हवं. आपण स्वतंत्र्य आहोत तर खरंच सुखी आहोत. पारतंत्र्यात असं सुख मिळणार नाही हे तेवढंच खरं. म्हणूनच याच अनुषंगाने मणीपुरातीलच नाही तर देशातील समस्त बांधवांना माझं एवढंच म्हणणं की पुरे झाला संघर्ष आणि जातीयवाद. आतातरी जातीयवाद व संघर्ष सोडा व संघर्षाची आग कायमची विझवा. त्यातच सर्वांचं भलं आहे. नाहीतर या देशाची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. हेही कोणीच विसरु नये.

admin: