मुंबई : (Manisha Kayande Join Shande Group) विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी रविवार दि. 18 जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची विधानपरिषदेची एक जागा कमी झाली आहे. शिवसेनेकडे असलेले विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली असलेले महाविकास आघाडीचे गडगडले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने नवीन सरकार स्थापन केलं आहे.
त्यामुळे सत्तेत असलेल्या शिवसेनेला विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर समाधान मानावे लागले आहे. ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच आमदारांनी बंडखोरी केली त्याच जिल्ह्यात मातोश्रीने विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते पदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली. मात्र, आता याच अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात आलं आहे. त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कांयदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे ठाकरे गटातील विधानपरिषद आमदरांची संख्या 10 वरुन 9 वर आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 आहे. त्यामुळे राष्ट्रवादी देखील विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची दाट शक्यता आहे. तर काँग्रेसचे देखील 8 आमदार आहेत त्यांना देखील अशी लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाच्या दाव्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.