मुंबई | Manoj Bajpayee – बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. मनोज बाजपेयी यांची ‘द फॅमिली मॅन’ ही वेबसिरीज चांगलीच गाजली होती. तसंच मनोज बाजपेयी हे नेहमीच चर्चेत असतात. आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी बाॅलिवूडचा किंग खान शाहरूख खानबाबत (Shah Rukh Khan) मोठं वक्तव्य केलं आहे.
‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयी यांनी शाहरूख खानबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “शाहरूखनं स्वतःभोवती निर्माण केलेलं विश्व आणि त्याला मिळालेलं मोठं यश पाहून मला खूप आनंद होतो. ज्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी उद्ध्वस्त झालं होतं, त्याच्या आई वडिलांचं छत्र हरवलं होतं, अशा परिस्थितीत त्यानं स्वतःचं कुटुंब पुन्हा उभं करत नाव मोठं केलं. त्याच्याबरोबर घडलेल्या गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या आहेत, त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. शाहरूखबद्दल माझ्या मनात कधीच द्वेष, मत्सर किंवा कटुता निर्माण होणार नाही.”
दरम्यान, मनोज बाजपेयी आणि शाहरुख खान यांनी 1989 साली एका टीव्हीवरील चित्रपटासाठी त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर ते दोघं 2004 मध्ये ‘वीर-जारा’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. तसंच आता लवकरच मनोज बाजपेयी यांचा ‘एक बंदा काफी है’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असून सध्या ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.