“शिवसेनेचा डाव लटके वहिनींनी ओळखावा इतकच…” मनसे नेत्याचं खळबळजनक ट्विट

rutuja latke 2rutuja latke 2

मुंबई | Manoj Chavan On Rutuja Latke – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्यानं त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली असून यावर आज (13 ऑक्टोबर) 11 वाजता सुनावणी होणार आहे. मात्र, यापूर्वीच मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनी ट्विटद्वारे ठाकरे गटावर (Thackeray Group) गंभीर आरोप केले आहेत.

ऋतुजा लटके यांची जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठी अनिल परबांचा हा सगळा डाव असल्याचा आरोप मनोज चव्हाण यांनी केला आहे. तसंच हा सगळा डाव एकनाथ शिंदे गटाचा असल्याचं अनिल परब (Anil Parab) म्हणाले होते. मात्र, आता मनोज चव्हाण यांनी यामध्ये ठाकरे गटाचाच हात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

मनोज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच…”, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.

Sumitra nalawade:
whatsapp
line