स्थगित नाहीच, फक्त शिथील! जरांगे पाटलांकडून अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ

जालना : (Manoj Jarange Patil On State Government) मागील पंधरा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र, आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं ते म्हणाले आहेत. आरक्षणाचं पत्र सर्वसामान्य मराठ्याच्या हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.

तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणतंही पाऊल उचलणार नाही. मी तुमच्यापुढे जाणार नाही. मी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पहिल्यांदाच बैठक घेतली. सर्व पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ठरावाची प्रत मला देण्यात आली आहे. मी पारदर्शकपणे काम करतो, असं जरांगे पाटील म्हणाले.

फक्त घोषणा दिल्याने आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आपल्यात फक्त एकविचार असला पाहिजे. आपल्याला अभ्यास करून आरक्षण मिळवायचे आहे. मागील दोन दिवसांपासून पाणी आणि उपचार बंद केले होते. पण आपल्या समजाच म्हणणं आहे की, आम्हाला आरक्षण आणि तुम्ही पण हवे आहेत. त्यामुळे रात्री उपचार घेतले. मी समजासाठी जीवाची बाजी लावणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे.

Prakash Harale: