मानुषी छिल्लरच्या अफेअरच्या चर्चा, ‘या’ बिझनेसमनला करतेय डेट

मुंबई | Manushi Chhillar – मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली माॅडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) ही तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मानुषीनं अभिनेता अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मानुषीचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तसंच मानुषी आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

मानुषी छिल्लर आता सिंगल नसून तिच्या आयुष्यात एका व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. ती एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. भारतातील झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामत (Nikhil Kamath) याला मानुषी डेट करत आहे.

मानुषी आणि निखिल यांनी अद्यापही त्यांच्या नात्याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. मात्र, ते दोघे अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. नुकतंच ते दोघे ऋषिकेशला फिरायला गेले होते. तसंच दोघांच्या एका जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचं प्रेम चांगलंच बहरलं असून त्यांचं नातं बरंच पुढं गेलं आहे. सध्या दोघेही एकत्र राहत आहेत.

दरम्यान, बिझनेसमन निखिल कामथनं बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरा हिच्यासोबत 18 एप्रिल 2019 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं होतं. मात्र, वर्षभरातच ते दोघेही विभक्त झाले. तसंच आता मानुषी आणि निखिल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Sumitra nalawade: