“तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत, जर तुम्ही…”; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

जालना | Maratha Reservation – आज (14 ऑक्टोबर) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भव्या सभा आयोजित करण्यात आली होती. जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगेंची सभा पार पडली. या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधवांनी हजेरी लावली होती. यावेळी मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगेंनी राज्य सरकारला थेट इशारा दिला.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या वतीनं सरकारला विनंती आहे की, तुमच्या हातात दहा दिवस आहेत. 40 दिवसांपैकी 30 दिवस झाले आहेत, आता फक्त 10 दिवस राहिले आहेत. त्यामुळे राहिलेल्या दहा दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा.

आज अंतरवालीत लाखोंचा जनसागर उसळला आहे. सर्व मराठ्यांचं एक म्हणणं आहे, राहिलेल्या दहा दिवसात आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्या शब्दावर आजही तो ठाम आहे. आम्ही चाळीस दिवस सरकारला एकही शब्द विचारणार नाही, असा शब्द दिला होता, असंही मनोज जरांगे म्हणाले.

पुढे त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला. तुमच्या हातात फक्त 10 दिवस उरलेत. या दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुम्हाला 40व्या दिवशी सांगू, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

Sumitra nalawade: