“सरकारला आम्ही वेळ दिला आहे, त्यामुळे मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय…”, मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण केलं होतं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. मात्र, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात जरांगेंचं आंदोलन सुरूच आहे. तर सरकारला वेळ दिला असून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी घराचा उंबराही चढणार नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. हा वेळ स्वत: सरकारनं मागितला असून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देतो असं त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे सरकारनं मागितलेला वेळ आम्ही त्यांना दिला आहे, असं मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

सरकारचं मत होतं की मराठ्यांना समितीचा अहवाल सादर करून टिकणारं आरक्षण देतो, त्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. तर आम्हीही त्यांना तसा वेळ दिला आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे सरकारनं ठरवायचं आहे. आम्हाला 40 व्या दिवशी आरक्षण पाहिजे असून त्यावर आम्ही ठाम आहोत, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: