मुंबई | Hemant Dhome’s Tweet In Discussion – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यामध्ये आता अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यानी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असते. हेमंत हा नेहमी विविध मुद्द्यांवर मत मांडताना दिसतो. तसंच नुकतंच हेमंतने एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत उपरोधिक ट्विट केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे.
“आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची! पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटी ला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती…काय म्हणता?” असं हेमंत ढोमेनं ट्विट करत म्हटलं आहे. त्यासोबत त्याने ‘बंड’ असा हॅशटॅगही वापरला आहे. त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.