खा. शरद पवारांचे प्रतिपादन
पिंपरी : खेड तालुक्याचा चेहरा औद्योगिकीकरण झाल्याने बदलला आहे. पूर्वी चार माणसांतील दोन माणसे ओळखीची असायची, आता मात्र तशी स्थिती राहिली नसल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाफगाव येथे शनिवारी ( दि. ११ जून ) रोजी बोलून दाखवली. चाकणमध्ये सध्या मराठी माणसे कमी आणि भय्ये अधिक दिसत असल्याचे देखील वक्तव्य केलं.
वाफगाव (ता.खेड, जि.पुणे) येथील भुईकोट किल्ल्यांमध्ये असणार्या रयत शिक्षण संस्थेच्या असलेल्या महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय दुसर्या जागेत स्थलांतर व्हावे, तसेच होळकरांचा भुईकोट किल्ला त्याचे जतन व्हावे तसेच दुर्लक्षित स्मारक हे मोठे पर्यटनस्थळ व्हावे, अशी मागणी होळकर यांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांची होती. त्यांच्या मागणीला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच आमदार रोहित पवार, आमदार दिलीप मोहिते यावेळी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, वाफगाव येथील भुईकोट किल्ल्यामध्ये असणारे रयत शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेच्या असणार्या विद्यालयाला पर्यायी जागा शोधून तेथे विद्यालय बांधण्यात यावे. विद्यालयाला म्हणजे रयत शिक्षण संस्थेला पाच-सहा एकर जागा मिळवून देण्यासाठी गावकर्यांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
येणार्या पुढील काळात वाफगाव येथील भुईकोट किल्ला उच्च दर्जाचे पर्यटनस्थळ व्हावे, अशा या मागणीला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान व होळकर घराण्याच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणार्या खेड तालुक्यातील वाफगाव येथील होळकर वाड्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी ११ जून २०२२ रोजी भेट दिली. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, रोहित पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार मोहिते यांनी खेड तालुक्याला कळमोडीचे पाणी देण्याबाबत विषय छेडला. शरद पवार यांनी याच कार्यक्रमात यावर तोडगा काढून उपस्थितांची मने जिंकली.
तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच महाराष्ट्रात होळकरांचे स्मारक जतन होईल. होळकरांचा भुईकोट किल्ला हा पर्यटनासाठी खुला करण्यात येईल. वाफगाव येथील पाण्याच्या प्रश्नासाठी भामा आसखेड येथून पाणी चासकमान धरणात सोडण्यात यावे तेच चासकमान धरणाचे पाणी वेळ नदीत सोडण्यात यावे, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, विविध सहकारी सोसायटीचे पदाधिकारी, महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय चे सर्व शिक्षक, तसेच ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.