मराठवाड्यातील द्राक्षांना मिळतोय विक्रमी दर, उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस

औरंगाबाद : (Marathwada Grape Farming) रोज बदलणाऱ्या वातावरणात देखील मराठवाड्यात (Marathwada) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचे कारण म्हणजे कधी नव्हे तो जास्तीचा भाव दाक्षांच्या बागांना (Grape Orchard) मिळत आहे. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक मधील द्राक्षे बाजारात येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे सुरुवातीला बाजारात आलेल्या मराठवाड्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पर्वणीच लागली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी मराठवाड्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

दरम्यान, कधी नव्हे एवढा भाव सध्या द्राक्षांना मिळताना दिसत आहे. उत्तम दर्जेच्या काळ्या द्राक्षाला सधारण 120 ते 130 रुपये प्रति किलो तर साध्या द्राक्षाला 80 ते 100 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. नशिक जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर द्राक्षाची लागवड करण्यात येते. त्यामुळे नाशिकला द्राक्षांचं माहेरघर समजले जाते. पण त्याआधी मराठवाड्यातील द्राक्षाला चांगला दर मिळत आहे.

औरंगाबादसह (Aurangabad), जालना (Jalna) जिल्ह्यांतील लवकर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांकडे व्यापारी सौद्यासाठी भेटी देत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील काळ्या द्राक्षांचा 121 रुपये प्रति किलोचा दर मिळत असून, इतर द्राक्षांना 50 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे. विशेष म्हणजे दर ठरल्याने काही ठिकाणी बागांत काढणी सुरु झाली आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे इतर पिकांसारखाच फटका द्राक्ष बागांना देखील बसला आहे. तर लांबलेल्या छाटण्याचाही परिणाम पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 30 ते 40 टक्के द्राक्ष बागा फुटल्याच नाही. आधीच कोरोनाच्या संकटात दोन हंगाम गेल्याने द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यात आता यंदा उत्पादनात घट झाल्याने याचाही फटका यावर्षी बसला असल्याचं शेतकरी सांगतायत.

Prakash Harale: